दापोली : तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आराध्य नेहा अतुल मेहता याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत आराध्यने तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हास्तरावर अकरावा क्रमांक मिळवून शाळा, पालक आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
आराध्यने मिळवलेल्या या यशामागे त्याची मेहनत, चिकाटी आणि नियमित अभ्यासाचा मोठा वाटा आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तो इतर विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम प्रेरणास्थान ठरला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुजय मेहता, सेक्रेटरी सुयोग मेहता, खजिनदार संकेत मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी आराध्यचे विशेष अभिनंदन केले.
त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही तो अशीच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आराध्यच्या या यशामुळे सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेकडून घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

