मुंबई : दादा इदाते यांच्या जीवनावर आधारित ‘समरसतेचा वारकरी’ या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद असलेल्या ‘Pilgrim Of Samarasata’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल विष्णू देव शर्मा यांच्या हस्ते २० मे २०२६ रोजी मुंबईतील लोकभवन येथे करण्यात आले.
हे मूळ मराठी पुस्तक लेखिका नीलिमा देशपांडे यांनी लिहिले असून, ऋतुराज पत्की यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.
या पुस्तकाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रस्तावना लाभली आहे.
या पुस्तकाच्या संकल्पनेविषयी माहिती देताना दादा इदाते यांनी नमूद केले की, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले अनेक सामाजिक प्रयोग, सामाजिक समरसता मंच, फुले-शाहू-आंबेडकर यात्रा, रिडल्सवाद, नामांतर आंदोलन आणि भटके विमुक्त विकास परिषद यासारख्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर या पुस्तकातून सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन केल्यानंतर राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हे पुस्तक नव्या पिढीतील तरुणांसाठी निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

