मुंबई : कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार,अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबतमी माहिती दिली आहे
(Anil Deshmukh Big Announcement).
COVID-19 नियमों का उल्लंघन करने के लिए IPC – 188 के अंतर्गत दाखिल किए गए केसेस को राज्य सरकार न्यायाईक प्रक्रिया का पालन करते हुए वापस लेगी। pic.twitter.com/weHyWghyUZ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 20, 2021
कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा या मागील मुख्य हेतू होता. हा लॉकडाऊन तीन अनेक टप्प्यांमध्ये बदलण्यात आला.
सुरुवातील कडेकोट संचारबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जसजशी कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत गेली तसतशा लोकांना अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली. मात्र, या काळात अनेकांनी नियमांचं उल्लंघन केलं. अनेकजण संचारबंदीच्या नियमांना धाब्यावर बसवून घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या विरोधात कठोर कारवाई केली होती.