रत्नागिरी जिल्हा परिषद सभापतींची घोषणा; उदय सामंत यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब

रत्नागिरी: कोकणच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

या सर्व नियुक्त्या आगामी सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असतील.
नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आला असून, जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नवनियुक्त पदाधिकारी आणि सोपवलेली जबाबदारी:

पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेली यादी खालीलप्रमाणे आहे:🟡 विलास चाळके: उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य)
🟡 मयुरी शिर्के: सभापती (महिला व बालकल्याण)
🟡 महेश नाटेकर: सभापती (कृषी, पशुसंवर्धन व औद्योगिक)
🟡 सुयोग कांबळे: सभापती (समाजकल्याण)
🟡 नंदकुमार मुरकर: सभापती (अर्थ व शिक्षण)

🟡 विलास चाळके: उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य)
🟡 मयुरी शिर्के: सभापती (महिला व बालकल्याण)
🟡 महेश नाटेकर: सभापती (कृषी, पशुसंवर्धन व औद्योगिक)
🟡 सुयोग कांबळे: सभापती (समाजकल्याण)
🟡 नंदकुमार मुरकर: सभापती (अर्थ व शिक्षण)

राजकीय व विभागीय समीकरणे

या निवडीमध्ये प्रादेशिक समतोल राखण्यावर भर देण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्याला झुकते माप देत दोन सभापती पदे देण्यात आली आहेत.

तर संगमेश्वर, गुहागर आणि चिपळूण या तालुक्यांना प्रत्येकी एक सभापती पद देऊन सर्वच मतदारसंघांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला आता खऱ्या अर्थाने वेग येणार असून, प्रलंबित विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*