दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिवलकर यांची बिनविरोध निवड

दापोली : आज दापोलीतील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या दापोली अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या रिक्त जागी आता दत्तात्रय बिवलकर यांची वर्णी लागली आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात एकूण 13 शाखांचे जाळे असलेल्या या बँकेने सहकार क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. बँकेचे क्रॉस डिपॉझिट 500 कोटींच्या घरात आहे.

दापोलीच्या आर्थिक जडणघडणीत आणि तालुक्याच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये या संस्थेचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला आहे.

सध्या ही बँक अध्यक्ष जयवंत शंकर जालगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून ग्राहकांना आधुनिक आणि उत्कृष्ट बँकिंग सेवा पुरवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

नवनियुक्त उपाध्यक्ष दत्तात्रय बिवलकर यांच्या निवडीमुळे बँकेच्या प्रशासकीय कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता असून त्यांच्या अनुभवाचा फायदा बँकेचा विस्तार करण्यासाठी आणि सर्वसामान्य खातेदारांच्या हितासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या निवडीनंतर अध्यक्ष डॉ. जयवंत शंकर जालगावकर यांच्यासह आशिष चंद्रकांत मेहता, संदीप रमाकांत दिवेकर, मेधा सूर्यकांत केळकर, सुभाष काळूराम मालू, निलेश जयवंत जालगावकर, माधव रामचंद्र शेट्ये, विनोद रघुनाथ आवळे, ऋषिकेश नंदकिशोर भागवत, संदीप रघुनाथ खोचरे, प्रमोद गोविंद काटकर, अन्वर अ. गफूर रखांगे, अशोक तुळशीराम जाधव, प्रभाकर पांडुरंग शिंदे, संगीता संदेश तलाठी आणि किरण प्रकाश परांजपे या सर्व संचालकांनी नवनियुक्त उपाध्यक्ष दत्तात्रय बिवलकर यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव महादेव थोरात, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद कृष्णाजी परांजपे, आत्माराम कानू चोगले यांच्यासह बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या निवडीचे स्वागत करत कौतुक केले आहे.

दापोलीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ही बँक सातत्याने विविध योजना राबवत असून नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ही घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*