दापोली : स्वातंत्र्यदिनी दापोलीतील उपजिल्हा रूग्णालयात २० खाटांचं ‘डीसीएचसी’ (डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर) विभाग सुरू करण्यात आलं आहे. आज एक रूग्ण उपचारासाठी या केंद्रात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांना आता रत्नागिरीत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यांच्यावर इथं चांगल्या प्रकारचं उपचार करता येणार आहे.
शिवसेना, भाजपा, युवासेना, पत्रकार संघटना, प्रसाद कर्वे आदींनी ‘डीसीएचसी’ची मागणी लावून धरली होती. आमदार योगेश कदम यांनीही याविषयात गांभीर्यानं लक्ष देऊन दापोलीकरांना दिलासा दिला आहे.
कोरोना रूग्णांसाठी दापोलीमध्ये मृत्यू झालेल्या रूग्णांचा आकडा मोठा होता. त्यात रत्नागिरीपर्यंतचा प्रवासही जीवेघेणा ठरत होता. सरकार आणि प्रशासनाच्या या सेंटरमुळे कोरोनाग्रस्त रूग्णांना नक्कीच आधार मिळाला आहे.
‘डीसीएचसी’मध्ये जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे. या मधील रूग्ण कोणाच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी रूग्णालयामार्फत घेण्यात आली आहे २० खाटांच्या या रूग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेंटीलेटरची सुविधा देखील इथं उपलब्ध झाली आहे.
पत्रकारांनी या सेंटरची मागणी लावून धरली होती. त्यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशाराही दिला होता. पण आता दापोली डीसीएचसी सेंटर सुरू झाल्यानं आमच्या लढ्याला यश आलं आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांवर आता उपचार करणं सोप होणार आहे. आता कोरोनाची भिती मनात न ठेवता उपचाराला सामोरं जाणं गरजेचं आहे.
दापोलीमध्ये डीसीएचसीची प्रचंड गरज होती. या केंद्रासाठी भाजपानं सर्व प्रथम मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पत्र दिलं होतं. आमच्या लढ्याला यश येऊन ते दापोलीत सुरू झालं आहे याचं आम्हाला समाधान आहे.
आमदार योगेशदादा कदम यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे. स्वातंत्र्य दिनापासून डीसीएचसी दापोली उपजिल्हा रूग्णालयात त्यांनी सुरू करून दाखवलं आहे. या केंद्रामुळं दापोलीतील रूग्णांना नक्कीच आधार मिळणार आहे. आम्ही योगेशदादांचे आभारी आहोत.
दापोलीकरांना आता आरोग्याच्या चांगल्या सुविधा दापोलीतच मिळणार आहेत. आ. योगेशदादा कदम यांनी सांगितलेल्या वेळेत ‘डीसीएचसी’चं काम पूर्ण करून दाखवलं आहे. त्यांचे मनापासून आम्ही आभारी आहोत.