रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना रूग्णांंचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णणांची संख्या 71 झाली आहे. कोरोना सध्या तरी थांंबताना दिसत नाहीये.
राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला रुग्ण तसंच राजापूर तालुक्यातील पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा, रत्नागिरी येथील एक 60 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
तालुकानिहाय मृतांची आकडेवारी
रत्नागिरी – 19
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 14
चिपळूण – 13
संगमेश्वर – 7
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
कोरोनामुळे मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. यावर उपाययोजना म्हणजे आरोग्य यंत्रणेला बळ देणं आहे. रिक्त जागा त्वरीत भरून रूग्णांना दिलासा देण्याचं काम करणं आवश्यक आहे.