गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व संबंधित अधिकारी यांनी वाचून त्याप्रमाणे तंतोतंत अंमलबजावणी करावी.

एस.टी बसेसच्या व्यवस्थेबाबत :

•पालकमंत्री यांच्या सूचनांनुसार कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईपुण्याहून येणा-या चाकरमानी लोकांसाठी एसटी ची व्यवस्था करण्यांत येणार आहे.

मुंबईहून दापोली व मंडणगड तालुक्यात येण्याकरीता वाहतूक मार्ग म्हाप्रळ मार्गे निश्चित करण्यात आलेला आहे.

तसेच खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्याकरीता कशेडी घाटमार्गे वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे.

Bus

जिल्हा सीमेवरील चेकपोस्टवर एसटी थांबवू नये.

बाहेरच्या जिल्हयातून येणारी एसटी थेट तालुकास्थळी जाईल. डेपो मॅनेजर यांनी प्रवाशांची यादी संबंधीत तहसीलदारांकडे दयावी.

Home quarantine संबंधांतील सूचनांचे हॅन्डबील एसटीमधील प्रवाशांना देण्यात यावे.

• एस.टी बसेसच्या वाहतुकीची माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हा उपनिबंधक गार्डीव एस.टी विभागामार्फत विभाग नियंत्रक भोकरे हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. नोडल अधिकारी यांनी Reporting चे नमुने तयार करावेत व वेळोवेळी अदयावत करावेत.

परतीचे प्रवासाचे आरक्षणसुध्दा करण्यात येणार आहे. तथापि प्रवासाचे वेळी आरक्षणाविषयी खात्री करुनच परतीच्या प्रवासाला परवानगी देण्यात यावी.

चेकपोस्टवर करावयाची कार्यवाही

महसूल- पोलीस- आरोग्य या यंत्रणांनी एकत्रितरित्या, सहकाऱ्याने आणि सामंजस्याने एकमेकांना मदत करुन काम करावे.

सिंधुदूर्गकडे जाणा-या एसटी थांबवू नयेत.
एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना पासची आवश्यकता नाही. परंतु खाजगी वाहनाने येणा-या लोकांकडे ई-पास अत्यावश्यक आहे.

खाजगी गाडयांनी येणा-या प्रवाशांची चेकपोस्टवर नोंद होणे आवश्यक आहे. सदरच्या नोंदी बिनचुक असाव्यात.

चेकपोस्टवरील नोंदी संबंधीत तहसीलदारांकडे पाठवाव्यात.

कशेडी, कुंभार्ली, मुर्शी या चेकपोस्टवर जास्तीत जास्त टीम नेमणेत याव्यात.

प्रवाशांमध्ये महिला, गरोदर स्त्रिया, लहान मुले, जेष्ठ नागरीक, दिव्यांग यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी

कशेडी मध्ये वारंवार गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. तेथे SDM आणि SDPO यांनी मिळून आवश्यक तशी यंत्रणा उभी करावी.

चेकपोस्टवर गर्दी झाल्यास प्रवाशांकडून माहितीपत्रक (sheets) भरुन घ्यावी. त्यासाठी आवश्यक तेवढया माहितीपत्रक नमुन्याच्या प्रति आगावू उपलब्ध करुन ठेवाव्यात.

स्क्रिनींग सेंटरवर कारावयाची कार्यवाही

एसटी तालुक्यातील स्क्रिनींग सेंटरवर थांबवण्यात यावी.

एसटी आल्यानंतर किंवा परत जाताना कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तिथे प्रवाशांचे स्क्रिनींग सेंटरवर नोंदणी व आरोग्य तपासणी करण्यात येईल.

Comorbid किंवा symptomatic किंवा जी व्यक्ती 55 वर्षे वरील असेल तर antigen test करणे. वैदयकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी एकत्रितपणे याबाबतचे निर्णय घेऊन काम करावे. आरोग्य तपासणी अंती करावयाच्या उपाययोजनांबाबतीत स्क्रिनींग सेंटरवरील आरोग्य अधिकारी हे अलगीकरण/ विलगीकरण उपचार याबद्दल कार्यवाही करतील.

Antigen test कीट वापरणेसाठी स्पेशल आयडी आणि मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडून देणेत येईल.

स्क्रिनींग सेंटरवर Antigen test kit / VTM kit व आवश्यक अधिकारी / कर्मचारी यांचा आवश्यक तो पुरवठा जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुरवावा.

तहसीलदारांनी स्क्रिनींग सेंटरच्या ठिकाणांची यादी एसटी डेपो मॅनेजरकडे दयावी, स्क्रिनींग सेंटर वर गर्दी होणार नाही याबाबतचे नियोजन करावे.

लाऊडस्पिकर वरुन व्यवस्थित माहिती/सूचना प्रवाशांना दयावी.
प्रवासी तिथे जितका वेळ थांबतील तेवढया कालावधीसाठी त्यांच्या खाण्या-पिण्याची, टॉयलेटची, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करावी. ही सर्व व्यवस्था करु शकेल अशी

एखादी स्वयंसेवी संस्था शोधावी.

प्रवाशांशी सौदाहर्यपूर्ण संभाषण करावे, त्यासाठी खास माणूस नेमावा.

प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ देऊ नका.

गणपतीउत्सव कालावधीमध्ये टेस्टींग क्षमता दुप्पट असणे आवश्यक आहे. . गर्दी हाताळण्यास पोलीसांची मदत घ्यावी.

तहसीलदार पोलीस निरिक्षक यांनी संयुक्तपणे समन्वयाने परिस्थिती हाताळावी.

पोलीसांनी बंदोबस्त कामी पोलीस मित्रांची मदत घ्यावी.

ग्राम/वाडी/नागरी कृती दल यांनी करावयाची कार्यवाही

नागरी कृती दल आणि ग्राम कृती दल यांना गणेशोत्सव काळात अधिक सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे.

तालुका पातळीवरील नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी, बीट अंमलदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच यांची बैठक घेऊन या कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत सूचना दयाव्यात. गावागावातून, वाडी वस्तीवर हॅन्डबील, फ्लेक्स, बोर्ड लावावे.

Home quarantine व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडता कामा नये, ही गोष्ट प्रत्येकाला समजली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त जागृती करावी.

नागरी कृती दलाने नगरसेवकांचे मार्गदर्शनाखाली जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे. नगरपरिषदेने पदाधिका-यांची बैठक घ्यावी. पोलीसांनी पोलीस मित्रांची मदत घ्यावी. .

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाने स्पष्ट परिपत्रक काढले आहे. सर्व यंत्रणांनी, नोडल अधिका-यांनी परिपत्रकातील सुचनानुसार कार्यवाही करावी

उत्सव काळात भांडण तंटे होणार नाही याकडे लक्ष दयावे. कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी,

गणेशोत्सव काळात बाहेरुन येणा-या लोकांच्या बाबतीत ज्या मार्गदर्शन सुचना आहेत, त्यांचे तंतोतंत पालन यंत्रणांकडून होणे बंधनकारक आहे.

तहसीलदारांनी आगार व्यवस्थापक यांचेकडून प्राप्त झालेली यादी ग्रामकृती दलाकडे पाठवावी. जेणेकरुन येणा-या लोकांची संख्या आणि नावे कृती दलाला समजू शकेल आणि त्यांचेवर लक्ष ठेवणे सुलभ होईल.

कृती दलांना जास्तीत जास्त कार्यान्वीत होण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

गावात येणा-या लोकांवर लक्ष देण्यास सांगावे.

काही गावांतील ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने तिथे प्रशासक नेमण्यांत आलेले आहेत. अशा ठिकाणी तलाठी किंवा ग्रामसेवक यांना कृतीदलाचे अध्यक्ष नेमावे व त्याप्रमाणे लेखी आदेश पारीत करावे. दुप्पट- तिप्पट स्क्रीनिंग सेंटर सुरु करावे.

रिकाम्या शाळा, हॉल, मोकळे मैदान याचा शोध घ्यावा.

मोकळया मैदानात व्यवस्था करावी.

CCC बाबत करावयाची कार्यवाहीसर्व ccc ची क्षमता वाढवावी. ती दुप्पट करावी. कळंबणी, कामथे, सावर्डे रुग्णालयात Remdesivir उपलब्ध करुन दयावे .

ccc वाढविताना THO/Tah/BDO यांनी समन्वयाने निर्णय घ्यावा.

ccC दुप्पट करुन घ्याव्या. Paid CCC उभ्या करुन घ्याव्यात.

नवीन ccc मध्ये आवश्यक त्या उपकरणे, औषधे, सुविधा आणि स्टाफ उपलब्ध करुन देण्यात यावा.

सर्वसाधारण सूचना

सोशल मिडीयावरुन चुकीची/ खोटी बातमी पसरविण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी स्तरावर कमिटी आहे. त्यांची बैठक घेऊन अशा खोटया बातम्या पसविणे हा सायबर गुन्हा असल्याची जाणीव करुन देणे.

अफवा किंवा धडधडीत खोटया बातम्या प्रसारीत झाल्यास तात्काळ शोध घेऊन कडक कारवाई करावी, प्रत्यक्षात कारवाई होऊ शकते असा संदेश सगळीकडे पसरला पाहिजे.

कारवाईची कृती करावी.

तालुका स्तरावर नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात करण्यात यावी.