रत्नागिरी / प्रतिनिधी

रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा करत होता. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात आहे. लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याची माहिती भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

खराब झालेलं धान्य

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट पोषण आहार पुरवठादारांकडून दिला जात असल्याचा तक्रारी येत आहेत. या प्रकाराबाबत भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला टार्गेट केलं आहे.

गोदामाची अवस्था

त्यात त्यांनी म्हंटले आहे की, रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात शालेय पोषण आहार निकृष्ठ आहे. त्याचबरोबर बुरशीयुक्त असताना देखील पुरवठादार निकृष्ट धान्य पुरवठा करत होता. ह्यात काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हाथ आहे, असा आरोप करत ते ही काही दिवसात नावा सकट बाहेर काढणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

तक्रार करून देखील या प्रकरणी कारवाई का होत नाहीये? असा सवालही निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.