दापोली : येथील नशेमन कॉलनीत स्नूकर खेळण्यावरून झालेल्या वादात पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नजीफ नाझीम रखांगे (वय २७, रा. काळकाईकोंड) हे ६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नशेमन कॉलनीत स्नूकर खेळण्यासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपी आलम बेपारी आणि त्याच्या साथीदारांनी (दाऊद बेपारी, आकीब बेपारी, कादीर बेपारी, आदम बेपारी) कारण नसताना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली.

आरोपी क्रमांक १ ने लाकडी दांड्याने नजीफच्या डोक्यात वार केला, त्यात ते गंभीर जखमी झाले.

तर इतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नजीफ यांच्या डोक्याला दोन टाके पडले आहेत.

गुन्हा दाखल आणि तपास:
नजीफ यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, १८९ (२), १९१ (२) आणि १९० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सपोउपनिरीक्षक गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.