दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित यू.के. पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे पवित्र रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी रमजान महिन्याचे महत्त्व सांगणारी भाषणे आणि शायरी सादर केली.
लहान मुलांनी रंगीबेरंगी चित्रं आणि रंगरंगोटी काढून रमजान सणाचा आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमात इफ्तार पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी घरी बनवलेले विविध खाद्यपदार्थ एकमेकांसोबत वाटून खाल्ले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम गैबी म्हणाले की,
“विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्त्व समजावे आणि त्यातून आपली संस्कृती जपली जावी, यासाठी शाळेने असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे.”
प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मारिया सारंग, उप मुख्याध्यापिका सानिया शेख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.