दापोली : दापोलीतील ब्रिलियंट करिअर अकॅडमी, मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व रामराजे इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तब्बल ५६२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कला सादर केली.

वयोगट ३ ते ६, ७ ते १०, ११ ते १६ आणि १७ वर्षांवरील खुला गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा रंगली.

या स्पर्धेचे परीक्षण वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट अँड डिझाईनचे निवृत्त डीन श्रीकृष्ण कुलकर्णी आणि विद्याधर ताम्हणकर यांनी केले.

जेसीआय दापोलीचे अध्यक्ष फराज रखांगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप साळवी आणि सदस्य उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते:
* ३ ते ६ वयोगट:
   * प्रथम: श्लोक कोलबंद्रेकर
   * द्वितीय: अधीर खडसे
   * तृतीय: इरा मंडलिक
   * उत्तेजनार्थ: चिन्मय देवरुखकर, ज्ञानदा कुलकर्णी, आरोही सकपाळ

* ७ ते १० वयोगट:
   * प्रथम: राही कर्जीवकर
   * द्वितीय: आरुषी कदम
   * तृतीय: शनाया बरजे
   * उत्तेजनार्थ: उमेर जसनाईक, मनस्वी कदम, श्रेया जाधव

* ११ ते १६ वयोगट:
   * प्रथम: शिल्पा मेहता
   * द्वितीय: गौतम कप्पटी
   * तृतीय: रुशदा भाक्षे
   * उत्तेजनार्थ: फातिमा पारकर, अंतरा कदम, पूर्वी झाटे

* १७ वर्षांवरील खुला गट:
   * प्रथम: पूजा कवठे
   * द्वितीय: वेदिका रेवाळे
   * तृतीय: अश्विनी सातारकर
   * उत्तेजनार्थ: स्वप्नील शिंदे, सुजल भुवड, मुनज्जा डिमटीमकर

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मराठा विद्या प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सुनील दळवी, डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, संचालक संदीप राजपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेच्या माध्यमातून चिमुकल्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळाले, तसेच कलाक्षेत्रात करिअर करण्याच्या संधींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले, असे मत प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दापोलीतील नागरिकांनीही या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.