दापोली : अजिंक्य आधार सामाजिक संस्था आणि जालगाव चॅलेंजर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अजिंक्य तलाठी स्मृती चषक २’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा आझाद मैदान, दापोली येथे २१ फेब्रुवारी २०२५ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अंतिम सामना रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी खेळवला जाईल.

स्पर्धेमध्ये अनेक स्थानिक क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेट खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.

अजिंक्य आधार सामाजिक संस्थेने नागरिकांना या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.