दापोली : प्रतिनिधी

दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण आता त्यांनी  आपली रजा 14 ऑगस्टपर्यंत वाढवून घेतली आहे. त्यांच्या जागी सध्या वैशाली पाटील काम पाहत आहेत.

24 मार्च पासून सतत कामात असल्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष झालं होतं. कोरोना आणि चक्रीवादळ या दोन्ही लढाईमध्ये लढत असताना त्यांची तब्येत थोडी खालावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे समीर घारे परिवर्तीत रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत रत्नागिरी तहसीलदार महसूल वैशाली पाटील यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांनी गुहागर तहसीलदार म्हणून काम पाहिलं आहे.