रत्नागिरी : राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, १८ फेब्रुवारी

  • सकाळी ७:५५: मांडवी एक्सप्रेसने खेडकडे प्रयाण
  • सकाळी ११:१८: खेड रेल्वे स्थानकात आगमन आणि निवासस्थानी (जामगे, ता. खेड) प्रयाण
  • सकाळी ११:४०: निवासस्थानी आगमन आणि राखीव वेळ
  • दुपारी १२:३०: दापोली कॅम्पकडे प्रयाण
  • दुपारी १:१५ ते २:००: दापोली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेस उपस्थिती (स्थळः दापोली कॅम्प)
  • दुपारी २:०० ते ३:००: दापोली तालुका दाखले कार्यक्रम आणि सत्कार (स्थळः डॉ. बाळासाहेब सावंत, कोंकण कृषी विद्यापीठ, विश्वेशरीया सभागृह)
  • दुपारी ३:०० ते ५:३०: दापोली, कोकंबा आळी संपर्क कार्यालयास भेट
  • सायंकाळी ६:००: भरणेकडे प्रयाण
  • सायंकाळी ७:००: भरणे येथे आगमन आणि मोफत दाखले वाटप कार्यक्रम व महसूल पंधरवडा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळः हॉटेल बिसू, भरणे)
  • रात्री ८:००: शरीर सौष्ठव स्पर्धा व कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती (स्थळः हॉटेल बिसू, भरणे)
  • रात्री ८:३०: सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड)
  • रात्री ९:००: भिंगळोलीकडे प्रयाण
  • रात्री १०:००: भिंगळोली येथे आगमन आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेस भेट (स्थळ: भिंगळोली)
  • निवासस्थानी (सोवेली, ता. मंडणगड) प्रयाण आणि मुक्काम