दापोली – येथील तबिश ताजुद्दीन परकार यांने जॉर्जियन अमेरिकन विद्यापीठातून MBBS ची पदवी प्राप्त करून आपल्या कुटुंबाचा आणि दापोली शहराचा गौरव वाढवला आहे.
आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण आहे, असे वडील ताजुद्दीन परकार यांनी सांगितले. तबिश याने आपल्या कठोर परिश्रमाने हे यश मिळवले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ताजुद्दीन परकार हे निवृत्त केंद्रप्रमुख असून त्यांची एक सज्जन आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून ओळख आहे. सामाजिक कार्यातही ते नेहमी सक्रिय असतात.
त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. आज त्यांच्या मुलाने हे यश मिळवून त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.
डॉ. तबिश याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दापोलीतील नागरिकांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निमित्ताने परकार कुटुंबियामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. सध्या परकार कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार नाहीये.