दापोली – श्री साई सेवा प्रतिष्ठान, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ ते १० या वेळेत अभिषेक सोहळा होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक शिवस्मारक ते पाटीलवाडी श्वेता पेट्रोल पंप या मार्गावरून जाईल.

सायंकाळी ७ ते ८ या वेळेत मान्यवरांचे स्वागत केले जाईल. रात्री ८ ते १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री साई सेवा प्रतिष्ठान, जोगेळे पाटीलवाडी, दापोली येथे हे सर्व कार्यक्रम पार पडतील.

श्री साई सेवा प्रतिष्ठानने नागरिकांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.