खेड : एका महिलेची मालकीची असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीने आपला टँकर क्युलॉन नावाच्या कंपनीला भाड्याने दिला होता.

क्युलॉन कंपनीने तो टँकर कुकिंग ऑइल घेऊन कर्नाटकात पाठवला, पण टँकरच्या चालकाला त्याचे भाडे मिळाले नसल्यामुळे त्याने तेल वेळेवर पोहोचवले नाही.

यामुळे महिलेने चालकाला टँकर घेऊन मुंबईला परत बोलावले. चिपळूणमध्ये पोलिसांनी टँकर थांबवला, कारण त्याच्याविरुद्ध तक्रार होती.

महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली बाजू मांडली. तिथे क्युलॉन कंपनीचा एक कर्मचारीही होता. पोलिसांनी हे प्रकरण कोर्टाचे आहे असे सांगून टँकर सोडला.

त्यानंतर, महिलेने आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये जेवण केले.

जेवण झाल्यावर काही अज्ञात लोकांनी टँकरच्या चालकाला मारहाण केली आणि महिलेसोबतही गैरवर्तन केले.

त्यावेळी क्युलॉन कंपनीचा कर्मचारी तिथेच होता आणि त्याने महिलेला शिवीगाळ केली.

या प्रकरणी पोलिसांनी क्युलॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

क्युलॉन कंपनीच्या कर्मचाऱ्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी खेड येथील मे. जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात अर्ज दाखल केला होता, ज्याला पोलिसांनी आणि महिलेने विरोध केला होता.

आरोपीतर्फे ॲड. स्वप्नील खोपकर यांनी युक्तिवाद केला. त्यांच्या प्रभावी युक्तिवादाने न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.