दापोली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका दापोलीच्या वतीने ‘स्वराज्य सप्ताह’ निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचा विषय: राजमाता जिजाऊंचा शिवबा

दिनांक: १९ फेब्रुवारी २०२५

वेळ: सायंकाळी ४ ते रात्री १०

स्थळ: पदमश्रद्धा हॉल, नर्सरी रोड, दापोली

बक्षीसे:

प्रथम क्रमांक: ५०००/- रुपये
द्वितीय क्रमांक: ३०००/- रुपये
तृतीय क्रमांक: २०००/- रुपये
चतुर्थ क्रमांक: १०००/- रुपये

नियम आणि अटी:

प्रत्येक स्पर्धकाला ४x३ फुटांची जागा रांगोळीसाठी देण्यात येईल.
दिलेल्या जागेत, विषयाला अनुसरून रांगोळी काढणे आवश्यक आहे.
जागेचा पूर्ण वापर करणे अपेक्षित आहे.
अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील.
नाव नोंदणीची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२५ आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्क:

अनिरुद्ध कदम: ९०२८४२७१५०
साधना बोत्रे: ७७६७८८७०००
विनिता शिगवण: ९०४९५२५५५४
अमिता तलाठी: ७७७६०००७५७
प्रीती जैन: ८१४९४९३५३६
मेघा खटावकर: ९४२०९०९३३१

वयो गट: १८ वर्षा पुढील

शिवरायांचे राज्य – बहुजनांचे राज्य – रयतेचे राज्य या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा असून, स्पर्धकांनी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित रांगोळ्या काढायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट रांगोळ्या सादर करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

१८ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे