नवी दिल्ली: १ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली येथील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या समारंभात दापोली तालुक्यातील पावनळ गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाचे संचालक रुपेश रमाकांत बेलोसे यांना अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवीनं गौरविण्यात आलं.
रूपेश बेलोसे यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, ज्याची दखल घेऊन त्यांना ही प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. संदीप मारवा, जे भारत सरकारच्या मीडिया अँड एंटरटेनमेंट कमिटीचे चेअरमन आहेत आणि भारतीय रेल्वे सेवेतील सदस्य आहेत, त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यासोबतच जोशू जीना, भाजपाचे प्रभारी बिपिन चौधरी, दिल्लीचे पोलीस अधीक्षक दीपक शर्मा आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होत्या.
रुपेश बेलोसे यांच्या कार्याचा गौरव करताना, अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने त्यांच्या सामाजिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.
त्यांनी शिक्षण आणि समाजसेवा यांमध्ये मोलाची भर घातली आहे, असे युनिव्हर्सिटीच्या निवेदनात म्हटले आहे. या सन्मानाबद्दल बेलोसे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे आणि भविष्यातही ते समाजासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.