दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर दापोली येथील राजीव रविंद्र जोशी सभागृहाचे उद्घाटन सोहनी विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका स्वाती रविंद्र जोशी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

सदरच्या सभागृहासाठी स्वाती जोशी आणि रविंद्र जोशी यांनी आपला मुलगा राजीव जोशी यांच्या स्मरणार्थ सभागृहासाठी २५ लाख रुपयाची संस्थेला विशेष देणगी दिली आहे.

या सभागृह वातानुकुलित सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी दापोली शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, संस्थेच्या नियामक मंडळाचे व्हाईस चेअरमन दिनेश नायक, संस्थेचे विश्वस्त समीर गांधी, ए.जी.हायस्कूलचे शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर, संस्थेचे संचालक श्रीकांत निजामपूरकर, मोहन शिगवण, श्रेयस काकिर्डे, नितीन शिंदे, आर्या भागवत, ए.जी. हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका नीलिमा देशमुख, रविंद्र जोशी, माजी विद्यार्थी अण्णा पटवर्धन आदी मान्यवरांचे स्वागत सोहनी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अनिल शेठ यांनी स्वागत केले.

यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांनी स्वाती जोशी, रविंद्र जोशी तसेच नीलिमा देशमुख यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानले.

तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये शालेय समिती चेअरमन व संस्थेचे व्हाईस चेअरमन दिनेश नाईक यांनी सुद्धा संस्थेला दिलेल्या देणगी बद्दल विशेष आभार मानून ऋण व्यक्त केले.

यावेळी संस्थेची पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक व्ही.जे.भुवड यांनी केले तर आभार वा. ना. दांडेकर बालक मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी टोपरे यांनी मानले.