चिपळूण : डेरवण इथं रत्नागिरी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर स्पर्धा 2025 पार पडल्या.

या स्पर्धेत दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा संदेश चव्हाण हिनं 14 वर्षाखालील मुली गटात गोळाफेक या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावलं.

तिचे पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यावेळी शाळेचे चेअरमन सुजय मेहता, सेक्रेटरी सुयोग मेहता, खजिनदार संकेत मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता, क्रीडा शिक्षक सुहास नलावडे आणि इतर सर्वशिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभले. विविध मान्यवरांनी तिला पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.