रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.

पहाटे 5.30 वाजता पाली निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता पाली येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

सकाळी 11 वाजता महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आणि शिक्षण विभाग (योजना) जिल्हा परिषद, रत्नागिरी आयोजित : जिल्हास्तरीय उल्लास मेळावा (स्थळ : मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी).

सकाळी 11.30 वाजता महर्षी सान्दीपनि राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिदिवसीय क्षेत्रीय वैदिक संमेलनास सदिच्छा भेट (स्थळ : माधवराव मुळ्ये भवन, झाडगांव).

दुपारी 12.30 वाजता शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बैठक (स्थळ : पाली निवासस्थान).

दुपारी 2 ते 4 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : पाली निवासस्थान) दुपारी 4 वाजता पाली हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने मुंबई कडे प्रयाण.