पारंपरिक शिक्षणाकडून कौशल्याधारित शिक्षणाकडे वराडकर कॉलेजची वाटचाल!
दापोली: विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत रोजगारक्षम बनविण्यासाठी वराडकर-बेलोसे महाविद्यालयात ‘महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम १ फेब्रुवारी २०२५ रोजी वराडकर-बेलोसे महाविद्यालयात संपन्न झाला.
उद्घाटन आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या संचालक जानकी बेलोसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की, “आणि त्यासोबतच्या कौशल्यांचा योग्य वापर करून महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होईल.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व समजावून सांगितले.
आजच्या युगात केवळ पदवी घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत राहण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्यावर भर द्या आणि रोजगार मागण्याऐवजी रोजगार देणारे बना, असं ते म्हणाले.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्य मिळवणे आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं
आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन व भारतरत्न महर्षी कर्वे स्कील डेव्हलपमेंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील युवक-युवतींना पारंपरिक पदवी शिक्षणासोबतच अल्पकालीन कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षणासाठी उपलब्ध कोर्सेसमध्ये टेलरींग व कटिंग, बेसिक आणि ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंग, ब्लाऊज व पंजाबी ड्रेस मेकिंग, गाऊन आणि नऊवारी साडी मेकिंग यासारख्या व्यावसायिक कौशल्यांचा समावेश आहे.
या प्रशिक्षण वर्गांसोबत विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन, सरकारी योजनांची माहिती आणि शासकीय प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक केंद्रप्रमुख रोहन धोंडू मोरे यांनी केले.
या उद्घाटन समारंभास महाविद्यालयाचे प्रा. बाळासाहेब गुंजाळ, डॉ. जयश्री गव्हाणे, डॉ. गणेश मांगडे, नगमा जिलानी, वृषाली कडू हे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
फॅशन डिझायनिंग शिक्षिका पूजा सचिन कांबळे, कार्यालय सहाय्यक आज्ञा संजय पाटील, टेलरिंग शिक्षिका साधना अमर अस्वले आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
कमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात प्रवेश सुरू झाला आहे.