सात पैकी तीन विद्यार्थी विरसईचे
दापोली : इस्त्रो- नासा अभ्यास दौर्यासाठी दापोली तालुक्यातून ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जि.प. रत्नागिरीचा हा स्वप्नवत उपक्रम असून गत तीन वर्षापासून ग्रामीण भागातील जि.प. शाळेत शिक्षण घेणार्या सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत इस्त्रो नासा अभ्यास दौर्यासाठी पाठवले जात आहे.
नुकत्याच झालेल्या चाळणी परीक्षा, मुलाखत आणि प्रात्यक्षिकातून दापोली तालुक्यातील दोन नासा तर पाच विद्यार्थ्यांची इस्त्रो दौर्यासाठी निवड झाली आहे. दापोली शिक्षण विभागातर्फे या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. तालुक्यापासून सुमारे ३५ कि.मी.अंतरावर दुर्गम खोर्यात वसलेल्या आदर्श गाव विरसई येथील जि.प.शाळेतील तब्बल तीन विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
विरसईसह, कुडावळे नं.१, जोगेळे नं.१, हर्णे तसेच जि.प. शाळा मळे या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
जान्हवी राजेंद्र तांबुटकर विरसई व अंंशुल विक्रांत पाटील कुडावळे नं.१ यांची नासा तर विनित विनय राणे, अथर्व गणेश तांबीटकर दोघे विरसई, सृष्टी संतोष चौधरी- हर्णे, आयुष मुकेश पांदे-मळे, आणि हर्ष अमोल कांबळे- जोगेळे नं.१ हे पाच विद्यार्थी इस्त्रो अभ्यास दौर्यासाठी दापोली तालुक्यातून निवडले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना विरसईचे संदिप भेकत, विनय राणे, मुरलीधर शिरसाठ, कविता भोये, कुडावळेच्या कविता कोराणे, गणेश चव्हाण, अश्विनी मोरे, शिवाजी जाधव, जोगेळेच्या आशाराणी राठोड, मानसी जालगावकर, योगेश्वरी सोंडकर, स्वप्ना आयरे, हर्णेच्या निलीमा धोपावकर, कांचन जाधव, मळेच्या दिनेश चिपटे, रश्मी पेवेकर आदी शिक्षक,
केंद्रप्रमुख धनंजय सिरसाट, सुनिल कारखेले, प्रवीण काटकर, दिनकर क्षिरसागर, विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, बळीराम राठोड, रामचंद्र सांगडे यांचे मार्गदर्शन तर गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांची प्रेरणा लाभली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी नोडल आॅफीसर शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड, पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे, व्हिजन अध्यक्ष धनंजय शिरसाट, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.