दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची ध्यानी मनी नसताना अचानक बदली झाली. वसई-विरार महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू होण्याचे आदेश निघाले. परंतु ते अद्यापही तिथे हजर झालेले नाहियेत. त्यामुळे ते दापोलीमध्ये पुन्हा एकदा मुख्याधिकारीपदी हजर होणार असल्याची माहिती माय कोकणच्या सूत्रांनी दिली आहे.
महादेव रोडगे यांनी दापोलीमध्ये पाण्याचा प्रश्न चांगल्याप्रकारे हाताळलं होतं. नारगोली धरण बांधल्यानंतर प्रथमच त्याची साफसफाई त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही घेतली होती.
महादेव रोगडे पुन्हा दापोलीत येणार असल्यामुळे कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती दापोलीत पहायला मिळणार आहे.