रत्नागिरी – कोरोनाच्या बाबतीत लोकांनी गंभीर व्हावं यासाठी सरकार आणि प्रशासन कसोशीनं प्रयत्नशील आहे. स्वयंमसेवी संस्था, सेलीब्रेटीसुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून सतत जनजागृती करून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी व्हावा यासाठी सगळेच प्रामाणिकपणे काम करत आहेत. जनजागृतीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा (बु.) नगरपंचायतीनं भन्नाट शक्कल लढवली आहे. या जाहिरातीची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे.

कोरोनाच्या या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना अतिशहाण्या नागरिकांना लोहारा नगरपंचायतीनं अनोख्या पोस्टद्वारे घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टरमध्ये बीग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे याचा आधार घेतला गेला आहे.

डॉन चित्रपटाचा “डॉन का इंतज़ार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है… डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। या सुप्रसिद्ध डायलॉगचा वापर लोहारा(बु.) नगरपंचायतीनं कोरोनाच्या जगजागृतीसाठी केला आहे. नगरपंचायतीच्या पोस्टरवर लिहिलं आहे की,

ज्या डॉनला पकडणं मुश्किकलच नाही तर नामुमकिन होतं, त्या डॉनला कोरोनानं पकडलंय. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका.

हाच तो व्हायरल होणारा डॉनचा पोस्टर

या बॅनरवर अमिताभ बच्चनचा डॉ चित्रपटातील फोटोही वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबद्दलचा संदेशही पोस्टरवर देण्यात आला आहे. इम्यूनीटी वाढवण्यासाठी काय करावं,  मास्क वापरणं किती आवश्यक आहे, सॅनिटायझरचा वापर आणि शासनाच्या निर्देशाचं पालन करणं किती आवश्यक आहे हे समजावण्यात आलं आहे.

हा पोस्टर संपूर्ण राज्यभरात व्हायरल होत आहे. फक्त अमिताभ बच्चन पर्यंत तो पोहोचलाय का? हे अद्यापही समजून आलेलं नाहीये. या पोस्टरचा दाखला देऊन अनेक नेटकरी विनाकारण बाहेर हिंडणाऱ्यावर निशाणा साधत आहेत.

Advt.