▪️ भारतात कोरोनाविरोधात लसीकरण मोहीम सुरु होऊन रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षाच्या काळात भारतात ७० टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

▪️ त्याचबरोबर ९३ टक्के नागरिकांनी लसीचा किमान पहिला डोस घेतला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज सांगितले.

▪️ लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी आज एका विशेष टपाल तिकीटाचेही प्रकाशन केले. आरोग्यमंत्री मंडावीया यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

▪️ टपाल तिकीटाच्या प्रकाशनानंतर मांडवीय म्हणाले, ‘‘संपूर्ण भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

▪️ काही जणांनी लसीकरण मोहिमेबद्दल गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान मोदींनी ठाम राहात सर्व नागरिक, शास्त्रज्ञ आणि कंपन्यांना प्रोत्साहन दिले. भारताने आज मोठे यश मिळविले असून आत्तापर्यंत १५७ कोटी डोस देण्यात आले आहेत.

▪️ आपल्या देशात मनुष्यबळाची किंवा बुद्धीमत्तेची कोणतीही कमतरता नाही. मात्र, लोकांमधील क्षमता हेरून त्यांना संधी दिली गेली पाहिजे.

▪️ केंद्र सरकार आणि खासगी क्षेत्राने लस विकसीत करण्यासाठी संयुक्तपणे काम केले. लसीकरणासाठीची सर्व प्रक्रिया सोपी केली.’’ मांडवीय यांनी लसीकरण मोहिमेशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ आणि कंपन्यांचेही आभार मानले.