दापोलीत 7, तर जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह

corona update
Corona

रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे.

यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. सदर 70 वर्षीय महिला रुग्णास रजिवडा येथून काल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेचा आज मृत्यू झाला. सदर महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नसून स्थानिक संसर्ग देखील नसल्याची माहिती आहे.

सायंकाळी प्राप्त 35 अहवालामध्ये असणारे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी – 2
कामथे – 14
कळंबणी – 5
गुहागर – 6
दापोली – 7
एकूण – 34
1- मृत्यू रत्नागिरी

एकूण 35

एकूण पॉझिटिव्ह ची संख्या – 912
बरे झालेले – 627
मृत्यू – 32

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*