रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 51 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात 24 तासात 32 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 911 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.50 टक्के आहे. नव्याने 51 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 666 इतकी झाली आहे.

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 453 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.12 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 177 तर संस्थात्मक विलीगिकरणात 125 रुग्ण उपचार घेत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*