काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. लांजा आणि संगमेश्वर येथील दाेन कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या वारसांना ही मदत देण्यात आली.
बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कोविड-१९चे संक्रमण काळात सुरुवातीपासून लॉकडाऊनमध्येही बँकेचे अधिकारी व कर्मचारी बँकेच्या ग्राहकांना अखंडपणे अविरत सेवा पुरवित आहेत. बँकेचे कर्मचारी व प्राथमिक शेती संस्थांचे सचिव सातत्याने बँकेच्या कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून कोविड-१९च्या प्रादुर्भावाने बँक कर्मचारी व शेती संस्थांचे सचिव यांचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेण्यात आला हाेता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*