जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 499, दापोलीत आज 15 जण बरे झाले

Covid

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 768 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय 1, संगमेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली 15 आणि 1 कामथे, चिपळूण मधील आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे

जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 21 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -24 रुग्ण
कळबणी – 1 रुग्ण
अँटीजेन – 1 रुग्ण

साखरीनाटे, राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 42 झाली आहे.

तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे

रत्नागिरी – 8
खेड – 4
गुहागर – 2
दापोली – 10
चिपळूण – 8
संगमेश्वर – 6
लांजा – 1
राजापूर – 2
मंडणगड – 1

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 1309
बरे झालेले – 768
मृत्यू – 42
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 499

सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 499 आहे. आज सन्मित्रनगर (रत्नागिरी शहर), लक्ष्मी आर्केड, साळवी स्टॉप, मौजे जयगड, मौजे कोतवडे घामेलेवाडी मौजे गावडे आंबेरे, मौजे झरेवाडी, हातखंबा, मौजे कर्ला मुसलमानवाडी, राजिवडा, मौजे कर्ला हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

जिल्ह्यात सध्या 105 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेडमध्ये 24 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 33 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3, गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 68, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 16, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 7, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी -3, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 2, केकेव्ही, दापोली – 12 असे एकूण 109 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरन्टाईन

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 15 हजार 510 इतकी आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*