रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. या मधील रत्नागिरीतील 3, दापोली 3 आणि कामथे 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 445 झाली आहे.
दरम्यान कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यात समाज कल्याण सीसी रत्नागिरी 1 आणि जिल्हा रुग्णालय रत्नागिरी 2 रूग्णांचा समावेश आहे.
सध्याची स्थिती खालील प्रमाणे :
एकूण पॉझिटिव्हची संख्या – 445
बरे झालेल्या रुग्णांची संख्या – 308
मृत्यू – 17
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 120