रत्नागिरीत एका दिवसात 35 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 4 दापोलीत

corona update
Corona

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांचा आकडा 554 वर पोहोचला आहे. आज एका दिवसात 35 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात थोडीशी चिंताजनक अशी स्थिती निर्माण झाले आहेत. या 35 जणांमध्ये दापोलीतील 4 रूग्णांचा समावेश आहे.

आज सापडलेल्या 35 जणांमध्ये राजापूर येथील 1, कळंबणी मधील 4, रत्नागिरी मधील 15, कामथे येथील 10, लांजामध्ये 1 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.

जिल्हावासीयांनी आता खबरदारीच्या उपाययोजनांंचे काटेकोरपणे पालन कारणं खूप गरजेचं बनलं आहे. इथल्या ग्रामीण भागामध्येही कोरोनानं आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे. परिस्थिती येत्या काही दिवसात अशीच राहिली तर जिल्ह्यात रूग्णांचा आकडा आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*