रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1499 झाली आहे. दरम्यान 46 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 904 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 5, संगमेश्वर 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 5, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 8, उपजिल्हा रुग्णालय कामथे-1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 4, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 12, कोव्हीड केअर सेंटर पाचल 5 आणि कोव्हीड केअर सेंटर मंडणगड 5 मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण
रत्नागिरी – 31 रुग्ण
घरडा, खेड – 11 रुग्ण
दापोली – 04 रुग्ण
कळंबणी -15 रुग्ण
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1499
बरे झालेले – 904
मृत्यू – 49
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 546
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 546 आहे. आज जुना माळनाका, कोतवडे सनगरेवाडी, लांजेकर कम्पाऊंड, भागिर्थी अर्पाटमेंट, फिनोलेक्स कॉलनी, क्रांतीनगर, झारणी रोड, आरोग्य मंदिर, स्टँडर्ड अर्पाटमेंट रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये, दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.