Covid

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1992 झाली आहे.

दरम्यान 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1335 झाली आहे.

आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय 6, समाजकल्याण मधील 9 आणि केकेव्ही, दापोली येथील 16 रुग्ण आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचं विवरण

रत्नागिरी – 20
कामथे – 28
कळबणी – 2
गुहागर – 6
दापोली – 2
ॲन्टीजेन टेस्ट – 2

मृतांचा आकडा पोहोचला 66 वर

कोकणनगर, रत्नागिरी येथील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच राजापूर येथील 58 वर्षीय तर हर्णे, दापोली येथील 67 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 66 झाली आहे.

तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी

रत्नागिरी – 16
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 14
चिपळूण – 13
संगमेश्वर – 7
लांजा – 2
राजापूर – 5
मंडणगड – 1

सायंकाळची स्थिती

एकूण पॉझिटिव्ह – 1992
बरे झालेले – 1335
मृत्यू – 66
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 591