रत्नागिरी : गेल्या 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 28  नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1774 झाली आहे.

दरम्यान 24 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1193  झाली आहे.

आज बरे झालेल्यांमध्ये  कोव्हीड रुग्णालय 6, समाज कल्याण 6, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 6, कोव्हीड केअर सेंटर घरडा आणि लवेल  मधील 6 रुग्ण आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी – 14 रुग्ण

कामथे – 14 रुग्ण

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे 

एकूण पॉझिटिव्ह – 1774

बरे झालेले  – 1193

मृत्यू  – 59

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 522

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (३० जुलै २०२० पर्यंत)

जिल्ह्यात सध्या 227 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. रत्नागिरी तालुक्यात 28 गावांमध्ये,  दापोली मध्ये 12 गावांमध्ये, खेड मध्ये 65 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 102 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 2 , गुहागर तालुक्यात 10 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  60,   उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 24,  कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -15, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 2, ग्रामीण रुग्णालय गुहागर – 1, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 22 असे एकूण 126 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरंटाईन

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 21 हजार 723 इतकी आहे.

15 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 17 हजार 817  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 17 हजार 256 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1774 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 15 हजार 469 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 561 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

Advt.