मुंबई : दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्यामुळे अनेकांनी परीक्षेचा फॉर्मच भरला नाही. त्या परीक्षा लवकर होणार असल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये धाकधूक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

परीक्षा पुढे गेल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर काहींनी नाराजी. कोरोनामध्ये परिस्थिती बिकट होत असताना आता परीक्षा घेणं योग्य नाही अशी भूमिका सरकारची आहे.

दहावी – बारावीची परीक्षा आता कधी होणार याची निश्चित तारीख समजू शकली नाहीये. पण दहावीची परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुलांचं आरोग्य हे आमचं पाहिलं प्राधान्य आहे. त्यांच्या आरोग्याला धोका पोहचवून परीक्षा घेण्यात काही अर्थ नाही. मे आणि जून पर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा आम्हाला अनुक्रमे संपवायची आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ याचीही आम्ही काळजी घेत आहोत.