
दापोली : पार्टीसाठी बसलेल्या मित्रानं टिव्ही लावण्यावरून वाढदिवस असलेल्या मित्राचंच डोकं पाईपनं फोडल्याची घटना समोर आली आहे. दापोली पोलीस स्टेशनमध्ये गिम्हवणे येथील माणिक आवटी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहाती अशी की, फिर्यादी सुहास मधुकर शिर्के व आरोपी माणिक जयंत आवटी हे आधीपासूनचे मित्र आहेत. यातील फिर्यादी सुहासचा वाढदिवस दि.०२/०९/२०२१ रोजी असल्याने त्याने वाढदिवसाचा केक वगैरे व पिण्याचं साहित्य घेवून पार्टीला गेला होता. सुहास आणि माणिक दोघेही दारु पिण्याकरीता माणिकच्याच घरी बसले होते. दारु पित असताना त्यांच्यामध्ये घरातील टि.व्ही लावण्यावरुन वाद झाला. दि. ०३/०९/२०२१ रोजी पहाटे ०४.०० वा.च्या सुमारास सुहास माणिकच्या घरातून बाहेर पडत असताना माणिक याने हातात लोखंडी पाईप घेवून येवून सुहासच्या डाव्या खांद्यावर, उजव्या हाताच्या मनगटावर लोखंडी पाईपाने मारहाण केली. त्यावेळी सुहास खाली वाकल्यावर संशयित आरोपी माणिकनं लोखंडी पाईप त्याच्या डोक्यात मारुन सुहासला जखमी केलं. ही घटना गिम्हवणे येथील सोनारवाडीत घडली.
०३/०९/२०२१ रोजी सकाळी ११.१५ वा. सुहास शिर्केनं माणिक आवटी विरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दखल केली. पोलीसांनी माणिक आवटी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply