हर्णे येथे समुद्रात बुडून मच्छीमाराचा मृत्यू

दापोली- हर्णे येथील मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे त्यामूळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मधुकर बामा पाटील ( वय-४०) हे कोणत्याही मासेमारी नौकेवर कायमस्वरूपी खलाशी म्हणून नव्हते तर ज्या नौकेवर खलाश्याची गरज भासेल अश्या नौकेवर ते मासेमारीकरिता खलाशी म्हणून जात असत.

असेच आज सकाळी ते एका नौकेवरून वरून आले आणि दुसऱ्या नौकेवर मासेमारीकरिता जाणार होते. त्यासाठी सकाळी घरी जाऊन आंघोळ करून घरी आपल्या पत्नीला मी दुसऱ्या नौकेवर मासेमारीकरिता जात आहे असे सांगून निघाले. ते हर्णे बाजारातून वस्तू खरेदी करून बंदराच्या दिशेने जात होते.

तेवढ्यात शौचास जाण्यासाठी म्हणून ते हर्णे किनारपट्टीलगत असणाऱ्या चांभार खडपात गेले तिथे जात असतानाच त्यांचा पाय घसरून ते किनारपट्टीलगतच समुद्राच्या पाण्यात पडले आणि तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती हर्णे पोलिसांनी दिली आहे.

मधुकर पाटील हे घरात एकटेच कमावणारे होते. पत्नी आपली ऐपत असेल तेवढीच मासळी खरेदी करून बाजाराला जात असे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तीही अजून शाळा शिकत आहेत. त्यामुळे आता पुढचं कोण बघणार असा यक्ष प्रश्न त्यांच्या पत्नीपुढे पडला आहे.

कमवता मुख्य घरचा आधारच गेल्यामुळे सदरचे पाटील कुटुंब हे निराधार झाले आहे. या घटनेची खबर कृष्णा चोगले यांनी दिली. सदरचा मृतदेह हा घटना खडपात घडल्यामुळे बराचवेळ खडपात होता लगेच गावचे पोलीस पाटील प्रकाश वागजे यांनी हजर होऊन स्थानिकांच्या मदतीने किनाऱ्यावर आणला. घटनेचा पंचनामा हर्णे पोलिसांकडून करण्यात आला आहे.
हर्णे मध्ये किनारपट्टीलगत मच्छिमाराचा बुडून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे. पहिल्यांदा ४ फेब्रुवारी रोजी फत्तेगड येथील राजा पावसे यांचा मासेमारीला जात असताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुसरी घटना ६ फेब्रुवारीला बुरोंडी येथील नारायण खांडेकर यांचा बोटीतून पडून मृत्यू झाला तर तिसरी घटना आज मधुकर पाटील यांची घडली त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*