दापोली : कोरोना महामारीच्या संकट काळात जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या आणि पूरग्रस्त खेड, चिपळूण तालुक्यात अनेकांचे प्राण वाचविण्याची चोख कामगिरी बजावलेल्या दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती किशोर देसाई, शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदिप राजपूरे, युवासेनेचे माजी राज्य विस्तारक ऋषिकेश गुजर, उपसभापती मनोज भांबिड, भाजपाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष श्रीराम ऊर्फ भाऊ इदाते, भाजपाचे शहराध्यक्ष संदिप केळकर, काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष आणि नगरसेवक अविनाश मोहिते, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन गायकवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर, कुणबी समाजाचे सुर्यकांंत म्हसकर, नरेंद्र आगरे, माजी नगरसेवक नितिन शिंदे, शिवाजीनगर (साखळोली) ग्रा.प.चे उपसरपंच सुभाष घडवले, राष्ट्रवादी काँग्रेस दापोली तालुका युवक अध्यक्ष विजय मुंगशे, धीरज पटेल, संजय तांबे, जितेंद्र जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस दापोली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक नितिन मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पोलिस ठाण्यातील बढती मिळालेल्या एम. आय. हळदे, अरूणा ढेरे, सुनिल पाटील, सुहासिनी मांडवकर, सांगर कांबळे, निधी जाधव, सोनाली गावडे, निलेश जाधव, सखाराम निकम, मोहन देसाई, मयूर मोर आदी पोलीस कर्मचाऱ्यांचाही यावेळी यथोचित सन्मान केला.