रत्नागिरी : कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोव्हिड लसीकरणाच्या कामामध्ये गती देण्यात येत आहे.
जिल्हयामध्ये या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी सुध्दा नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी बी.एन. पाटील व जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जिल्हावासियांना केल्या आहेत.
जिल्हयामध्ये दिनांक २८-११-२०२१ रोजीची कोविड १९ बाधीत रुग्णांची आकडेवारी पहाता तालुका रत्नागिरी ६ रुग्ण व तालुका राजापूर २ रुग्ण असे एकूण ८ कोविड १९ बाधीत रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी म्हटले आहे.
कोव्हिड आजाराचे सावट अजूनही पूर्णतः दूर झालेले नाही. जिल्ह्यामध्ये कोव्हिड रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी कोरोना संसर्गाच्या काळात नियमित मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व फिजिकल डिस्टसिंग ठेऊन या गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर कोव्हिड लसीकरणाने मोठया प्रमाणात विजय मिळवून आजारावर प्रतिबंध करता येणे शक्य आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोव्हिड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण कोविड लसीकरण पहिल्या डोसची मात्रा ९४८७५२ व दुसऱ्या डोसची मात्रा ४५४९४० अशी एकूण १४०३६९२ लसींच्या मात्रा देऊन नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर कोव्हिड लसीकरणाने मोठया प्रमाणात विजय मिळवून आजारावर प्रतिबंध करता येणे शक्य आहे.
कोव्हिड आजाराचे सावट अजूनही पूर्णतः दूर झालेले नाही. जिल्ह्यामध्ये कोविड रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोविड लसीकरण हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे कोविड लसीकरणाला गती देण्यात येत आहे.
यामुळे नागरिकांनी कोविड लसीकरण अवश्य करुन घ्यावे असे आवाहन मा. उदयजी बने उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.
नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, फिजिकल डिस्टसिंगचा वापर करावा, नियमीत मास्कचा वापर करुन योग्य वेळी सॅनिटायझरचा वापर करावा.
तसेच नागरिकांमध्ये केलेल्या लसीकरणामध्ये १०० टक्के लाभाथ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देऊन व त्यानंतर ज्या लाभार्थ्याचा दुसरा डोस राहिला आहे तो प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन डॉ. अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.