दापोलीच्या तरुणाचा चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

चिपळूण: गोवळकोट-भोईवाडी परिसरात शुक्रवारी (१६ मे २०२५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.

स्थानिकांनी केलेल्या शोध मोहिमेनंतर सायंकाळी या तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडला. अनंत अशोक निवाते (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तो मूळचा दापोली तालुक्यातील ओणानवसे गावचा रहिवासी असून, गोवळकोट येथे आपल्या आजोळी आला होता.

प्राप्त माहितीनुसार, अनंत निवाते होडीत बसला होता, त्यानंतर तो अचानक गायब झाला. तो कुठेही दिसून न आल्याने स्थानिकांनी शोधाशोध सुरू केली.

अखेर सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून, नदीच्या पात्रातील धोक्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*