दापोलीत ‘निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर’लवकरच सेवेत; योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार

दापोली (जि. रत्नागिरी): दापोली शहरातील मेहता हॉस्पिटल समोर, शर्वरी सदन येथे ‘निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर’ हे नवीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू होणार आहे.

सोमवार, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता या सेंटरचे उद्घाटन योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे.

डॉ. समिक्षा कुणाल मेहता (MBBS, DMRE, Fellowship in Fetal Medicine) आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता (MBBS, MS, FMAS) हे सेंटर सुरू करणार आहेत.

दापोलीकरांना आधुनिक वैद्यकीय सेवा पुरवणे हा या सेंटरचा मुख्य उद्देश असेल.

या उद्घाटनाच्या निमित्ताने दापोलीतील नागरिकांना उच्च दर्जाच्या सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सुविधा उपलब्ध होतील.

या सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक निदान आणि उपचार केले जातील, असा विश्वास डॉ. मेहता यांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला दापोली शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. समिक्षा कुणाल मेहता आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांनी दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*