दापोली: ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने दापोली शहरात महिला नागरी सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील २५ महिलांचा सत्कार करण्यात आला.

शिंदे सेवावृत्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रदेश प्रवक्ते माधव शेट्ये यांच्या मार्गदर्शनाने झाली.

त्यानंतर तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर यांनी शेतीपूरक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ महिलांना स्मृतीचिन्ह व केळीचे रोप देऊन गौरविण्यात आले.

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ममता बिपीन मोरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, तालुकाध्यक्ष निशा सावंत, जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर, जिल्हा सदस्य आशा महाडिक, देवरुख तालुकाध्यक्ष दीपिका किर्वे, खेड तालुकाध्यक्ष तेजा बैकर, अंजली बेकर, प्रियंका चव्हाण, सोनाली आडविलकर, प्रदेश प्रवक्ते माधव शेट्ये, तालुकाध्यक्ष सचिन तोडकर, शहराध्यक्ष खलील डिमडीमकर, रहूफ काझी, शहाबुद्दीन बर्डे, खजिनदार दिनेश महाडिक यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष निशा सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना केळीचे रोप देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.