दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, ८ मे रोजी सायंकाळी ७:२५ वाजता करण्यात आली.

याबाबत पोलीस हवालदार स्वप्नील शिवलकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दापोली-दाभोळ रोडवर सार्वजनिक शौचालयाच्या पूर्वेकडील बाजूला एका कांदा-बटाटा विक्रीच्या हातगाडीजवळ ही महिला संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी तिची तपासणी केली असता, तिच्याजवळ अंदाजे ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा विक्रीसाठी ठेवलेला आढळला.

आरोपी महिलेवर अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८(क) आणि २२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*