रत्नागिरी: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखांबा येथे दुचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन महिला ठार झाली आहे. दुचाकी (एम एच 08 1299) वर महिला आणि मुलगा प्रवास करत होते. या दुचाकीला ट्रक (के ए डी 2555) ची जोरदार धडक या अपघातात महिला जागीच ठार मुलगा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान दुचाकी चालविणाऱ्या मुलाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.