एटीएममधून पैसे काढणे आता महागणार, RBI नियमांत बदल

मुंबई : एटीएममधून पैसे काढणे 1 ऑगस्टपासून महागणार आहे. 1 ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्जॅक्शनवरील शुल्क वाढवले आहे. आरबीआयने आर्थिक व्यवहारासाठी इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपयांवर आणली आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहे. ग्राहकांना बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत ट्रान्जॅक्शन मिळतात. यात फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शनचा समावेश आहे. यानंतर एटीएममधून प्रत्येक ट्रान्जॅक्शनसाठी 20 रुपये द्यावे लागतील. तर अन्य बँकांचे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये 3 आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत एटीएम ट्रान्जॅक्शन मिळतात. 1 जानेवारी 2022 पासून हे शुल्क आकारले जातील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*