शॉक लागून वायरमनचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील भू गावातील वायरमनचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३२ वर्षीय सुनिल यशवंत चौगुले महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामाला होते.

शुक्रवारी दुपारी वीजेच्या दुरूस्तीचं काम करत असताना सुनिल यशवंत चौगुले या वायरमनला जोरदार वीजेचा झटका बसला. त्यांना तातडीनं राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. ३२ वर्षी सुनिल यांच्या जाण्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*