जिम, स्विमिंग पूल, स्पा 100% बंद, काय आहेत नवे निर्बंध

राज्यमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं संकट उभं राहत आहे. दर दिवशी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने कठोर पावलं उचलणं अपेक्षित होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत.

राज्य सरकारनं काही गोष्टींवर कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठीच ही पावले उचलण्यात आली आहेत. उद्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू होणार आहे.

शाळा, महाविद्यालय, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, चित्रपटगृहे सलून, सरकारी आणि खाजगी कार्यालये आदींसाठी नवे निर्बंध लागू होणार आहेत.

नवे निर्बंध

🔹पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू (5 पेक्षा जास्त लोकं एकत्र फिरू शकत नाहीत)

🔹रात्री 11 ते पहाटे पाज वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार (फक्त अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडू शकता)

🔹नाट्यगृह सिनेमागृहात, सलून मध्ये 50 टक्के उपस्थिती

🔹मैदान, उद्याने आणि पर्याटनस्थळे बंद

🔹स्वीमिंग पुल, जिम, स्पा पुर्णपणे बंद

🔹 शाळा, कॉलेज 15 फ्रेब्रुवारी पर्यंत बंद

🔹हॉटेल आणि रेस्टॉरट 50 टक्के क्षमतेने 10 पर्यंत चालू राहणार

🔹लोकल वाहतूकीवर निर्बंध नाही

🔹शासकीय कार्यालयात परवानगी शिवाय जाण्यास बंदी

🔹लग्नात फक्त 50 लोकांची मर्यादा (पूर्व परवानगी आवश्यक)

🔹अंत्यविधीत फक्त 20 लोकांचा सहभाग

🔹राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक सभांमध्ये 50 लोकांचा सहभाग (पूर्वपरवानगी आवश्यक)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*